आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वक्तव्य:..तर पिंपळगाव पिसा गटात किंवा देवदैठण गणांमध्ये निवडणूक लढवणार : अमोल बोरगे

श्रीगोंदे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​​नव्याने स्थापित झालेल्या पिंपळगाव पिसा गट व देवदैठण गण यामध्ये जर अनुसूचित जातीचे आरक्षण लागल्यास संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार आहे, असे प्रतिपादन ढवळगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल किसन बोरगे यांनी केले. ढवळगाव हे या पूर्वी येळपणे गट व येळपणे गणामध्ये मोडत होते. परंतु नव्या प्रभाग रचनेमध्ये ढवळगाव हे गाव पिंपळगाव पिसा गटामध्ये व देवदैठण गणांमध्ये समाविष्ट झाले.

त्या अनुषंगाने अमोल बोरगे यांनी या गटामध्ये किंवा गणांमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण निघाल्यास निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. पिंपळगाव पिसा गट किंवा देवदैठण गणामध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण आल्यास निवडणूक लढणार व गटामध्ये व गणांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्यामार्फत तसेच विविध विभागांमार्फत शासनाच्या शेळीपालन, गोठा, गाय-म्हैस, स्प्रिंकलर, पीव्हीसी पाईप, मिरची कांडप यंत्र, पीठ गिरण, शिलाई मशीन, सोलर हिटर, कडबा कुट्टी, शाळेतील मुलींना सायकली, विहीर, संगणक यासारखे अनेक अनुदानामध्ये विविध योजना प्रभावीपणे राबवणार योजना आपल्या दारी हा उपक्रम घेऊन तालुक्यामध्ये नवीन पायंडा पाडणार आहे, असे बोरगे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...