आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपलब्ध:न्यायदानाच्या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एलएलबी, एलएलएमची पदवी प्राप्त केल्यानंतर, श्रुतिका सतिश रामदिन यांनी अहमदनगर जिल्हा न्यायालायात वकिली केली. पुढे महाराष्ट्रातील सर्वात कठीण परिक्षांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत राज्यात तेरावे स्थान मिळवून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदावर झेप घेतली आहे. श्रुतिका सतीश रामदिन या पद्मकन्येने न्यायदानाच्या क्षेत्रात मिळवलेल्या यशाबद्दल पद्मशाली युवा शक्ती ट्रस्ट, पद्मशाली महिला शक्ती व पद्मानादम ढोल, ताशा, ध्वज पथकाच्यावतीने शाल, श्रीफळ, व मानपत्र देऊन श्रुतिका रामदिन यांचा सन्मान केला.

याप्रसंगी नारायण मंगलारम, मार्कंडेय विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य दीपक रामदिन, श्रुतिकाचे वडील सतीश रामदिन, योगेश ताटी, अजय म्याना, सागर बोगा, सुमित इप्पलपेल्ली, योगेश ताटी, योगेश म्याकल, श्रीनिवास इप्पलपेल्ली, शुभम बुरा आदी उपस्थित होते. श्रुतिका रामदिन वसमत (जिल्हा हिंगोली) येथे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

श्रुतिका रामदिन म्हणाल्या, न्यायदानाच्या क्षेत्राची भीती सर्वसामान्यांना आणि आपल्या समाजातील लोकांना वाटत असली, तरी करिअर करण्याच्या खूप मोठ्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. कुठलाही क्लास न लावता पहिल्या प्रयत्नात एमपीएससीच्या मुलाखतीपासून माघारी आल्यावर घरच्यांनी दाखवलेला विश्वास, काकांनी केलेले मार्गदर्शन आणि जिद्दीने घेतलेली मेहनत या जोरावर मी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पदाला गवसणी घालू शकले. भविष्यात कोणालाही मार्गदर्शनाची गरज असेल तर मी सदैव तत्पर आहे, असे आपल्या सन्मानाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.

मंगलारमन म्हणाले, श्रुतिकाने मिळवलेले यश दिव्यत्वाची प्रचिती देणारे. एका कामकरी, कष्टकरी समाजातून व उच्चशिक्षित कुटुंबातून येऊन तिने मारलेली कर्तृत्वाची उंच गगनभरारी आमच्यासाठी प्रेरणादायी, असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन श्रीनिवास एल्लाराम यांनी केले तर आभार दीपक गुंडू यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...