आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महसूलमंत्र्यांच्या जिल्ह्यातच महसूल कर्मचारी नाहीत:40 सहायक,18 मंडळाधिकाऱ्यांच्या जागा रिक्त

बंडू पवार | नगर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिवृष्टीमुळे अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यातच मंडलाधिकाऱ्यांसह महसूल सहायकांचा तुटवडा आहे. जिल्ह्यात १४० महसूल सहायकांची, तर १८ मंडळाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. म्हणूनच पिकांचे पंचनामे होण्यास विलंब लागत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार गावांमधील ३ लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. महसूल विभागाकडेच कर्मचाऱ्यांचा वानवा असल्यामुळे पंचनामे करा पण कमी मनुष्यबळात अशी स्थिती आहे. यामुळे आपत्कालीन स्थितीत किंवा अतिवृष्टीच्या परिस्थितीत कमी मनुष्यबळ काम करताना महसूल कर्मचारी तारेवरची कसरत करत आहेत. पेन्शन नको पण रिक्त पदे भरा असे आता आम्हाला म्हणावे लागत आहे. असे महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब डमाळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...