आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण भागात:‘झेडपी’च्या पाणीपुरवठा विभागात ठेकेदारांची वर्दळ

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हर घर, नल से जल या अभियानांतर्गत जिल्हाभरात जलजीवन मिशन हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार सुमारे ८२० योजनांची निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. निविदा स्विकृती करताना नियम डावलल्याचे आरोप ठेकेदारांकडून होत आहे. तसेच काम पदरात पाडून घेण्यासाठीही ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात गर्दी वाढली आहे.

कोट्यवधी रूपयांच्या योजनेची कामे जिल्हाभर हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत ८२० योजनांची निविदा प्रक्रिया राबवली असून, ७४३ योजनांच्या कामाला कार्यारंभ आदेश दिले आहेत. योजनांची कामे सुरू होत असतानाच, दुसरीकडे तक्रारीही वाढत आहेत. टपालात दाखल तक्रारींचा निपटारा करण्यासाठी एका कर्मचाऱ्याकडे दोन तालुके याप्रमाणे जबाबदारी सोपवली आहे. हे कर्मचारी वॉर रूममध्ये बसून निपटारा करत आहेत. निविदा प्रक्रियेत कमी दराने निविदा दाखल करणाऱ्यांना डावलले जात असल्याचा आरोप काही ठेकेदारांकडून होत आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंत्यांचे दालन सध्या हाऊसफुल्ल आहे. या गर्दीमुळे प्रशासकीय कामाला वेळ मिळत नसल्याने, कार्यकारी अभियंता अँटी चेंबरमध्ये जातात. तेथेही पोहोचण्यासाठी काही ठेकेदारांची लगबग सुरू असल्याचे चित्र बुधवारी या विभागात दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...