आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:चाळीस दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणीचा तपास नाही; श्रीरामपुरात मोर्चा

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपुरातील एक तरूणी ४० दिवसांपासून बेपत्ता असूनही तिचा तपास लागला नाही. या प्रकरणाचा तपास करून आरोपीला शोधून त्याच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी श्रीरामपुरात शिवप्रहार प्रतिष्ठानच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सहायक निरीक्षक जीवन बोरसे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. एका कॉलेज तरूण मुलीला एका तरूणाने पळवून नेलेले आहे.परंतू, पोलीस ठाण्यात याबाबत फक्त मिसिंगचा गुन्हा दाखल झालेला आहे. सदर प्रकार हा लव जिहादचा असल्याने सदर तरूणाचा शोध घेवून कारवाई करण्यासाठी मुलीच्या कुटूंबीयांनी अनेकदा निवेदनं दिले.

परंतू मुलीचा तपास न लागल्याने आज या प्रकरणी शिवप्रहार प्रतिष्ठान आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठया संख्येने तरूण सहभागी झाले होते. श्रीरामपूर शहरात लव जिहादचे प्रकार वाढत असून याला वेळीच आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. शहरात एका मुलीला पळवून नेले जाते, त्यांचे कुटुंबीय पोलीसांकडे निवेदन देवून मागणी करते. त्यांना न्याय मिळत नाही म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढतो तर आम्हालाच उलट नोटीसा दिल्या जातात. मग लोकशाही मार्गानेही न्याय मागायचा नाही का? येत्या चार दिवसात जर सदर प्रकरणाचा तपास न लागल्यास आणि आरोपीला अटक न झाल्यास शहरातील व्यापारी वर्गाशी विचारविनिमय करून श्रीरामपूर बंद बाबतचा निर्णय किंवा लोकशाही मार्गाने अन्य आंदोलनाबाबत निर्णय घेतला जाईल, असे यावेळी शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख सूरज आगे यांनी दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...