आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार:यश मिळवण्यासाठी शॉर्टकट नसतो : शर्मा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले उद्दिष्ट साधण्यासाठी अभ्यास आणि परिश्रम याशिवाय पर्याय नाही. जीवनात यश मिळवण्यासाठी कुठलाही शॉर्ट कट नसतो. विद्यार्थ्यांनी नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन यशश्री अकॅडमी च्या संस्थापक अनुरिता शर्मा यांनी केले. जैन कोचिंग क्लासमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर यश शर्मा, क्लासच्या संस्थापिका सोनाली जैन, अध्यक्ष अतुल जैन उपस्थित होते.

यश शर्मा यांनी विद्यार्थ्यांना विविध भाषा शिकायचे आणि पुस्तक वाचायचे महत्त्व उदाहरणासह सांगितले. पाहुण्यांच्या हस्ते भार्गवी पुंड, कौशल आंधळे, अर्चित मालानी, जगज्योत सिंघ, स्वराज अकोलकर, कुलदीप नाथ या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक सोनाली जैन यांनी, तर आभार अध्यक्ष अतुल जैन यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षक सेजल दोडेजा,नेहा दंडवानी, रचना शिंदे, बल्लाळ, योगिता दायमा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...