आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाटा एन्ट्री ऑपरेटर आंदोलन:मंत्रालयातील बैठकीत तोडगा नाहीच‎

नगर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विविध प्रलंबित मागण्यासाठी नगर जिल्ह्यातील‎ रोजगार हमी योजनेंतर्गत डाटा इंट्रीचे काम‎ करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून (१‎ फेब्रुवारी) सुरू केलेले काम बंद आंदोलन‎ शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी सुरूच होते.‎ काम बंद आंदोलनामुळे रोजगार हमी योजनेवर‎ काम करणाऱ्या मजुरांची दैनंदिन ई-‎ मस्टरवरील नोंदणी थांबली आहे. दरम्यान,‎ कंपनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात‎ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली मात्र‎ त्यात कुठलाही तोडगा निघाला नाही.

त्यामुळे‎ हे कंत्राटी कर्मचारी संपावर ठामच आहेत.‎ मनरेगाची स्वतंत्र यंत्रणा तयार करून‎ कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आकृतीबंधामध्ये‎ समायोजन करण्यात यावे, पश्चिम बंगालच्या‎ धर्तीवर मानधन देण्यात यावे, योजनेतील सर्व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य निधी‎ असोसिएशनमध्ये नियुक्ती देण्यात यावी,‎ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर २०१९मधील‎ मानधन वाढीतील प्रलंबित फरकाची रक्कम‎ तात्काळ अदा करावी

या प्रमुख मागण्यांसाठी‎ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी‎ योजनेंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून काम बंद आंदोलन‎ सुरू केले होते.‎ गुरुवारी ही हे काम बंद आंदोलन सुरू होते.‎ शुक्रवारी देखील कर्मचारी संपावर ठाम होते.‎ तीन दिवसांपासून सुरू असलेल्या काम बंद‎ आंदोलनामुळे रोजगार हमी योजनेवर काम‎ करणाऱ्या मजुरांचा रोजगार बुडत आहे.‎

बातम्या आणखी आहेत...