आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:स्पर्धेत भाग घेतल्याशिवाय यश मिळत नाही

नगर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजचे युग हे स्पर्धेचे आहे. प्रत्येक‎ क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे.‎ शैक्षणिक, व्यावसायिक, राजकीय‎ आदी क्षेत्रात तर स्पर्धा जास्त सहभागी‎ होणारे कमी अशी परिस्थिती असते.‎ विद्यार्थ्यांना स्पर्धेत भाग घेतल्याशिवाय‎ आपल्यातील गुणवत्तेची कल्पना येत‎ नाही. स्पर्धा कोणतीही असो सहभागी‎ व्हा, चांगली तयारी करा यश मिळतेच,‎ असे प्रतिपादन पाउलबुधे बी.फार्मसी‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नीलेश‎ जाधव यांनी केले.‎ शिरुर येथील सिताबाई थिटे कॉलेज‎ ऑफ फार्मसी येथे मॉडेल मेकिंग‎ कॉम्पिटिशनमध्ये डॉ. ना. ज. पाउलबुधे‎ फार्मसी कॉलेज्स विद्यार्थ्यांनी वार्किंग‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ मॉडेल ऑफ सीपीआर सादरीकरण‎ केले. या मॉडेलला तृतीय क्रमांक‎ मिळाला, याबद्दल विद्यार्थ्यांचा‎ कॉलेजच्यावतीने सत्कार करण्यात‎ आला.

याप्रसंगी प्राचार्या डॉ.रेखाराणी‎ खुराणा, प्राचार्य डॉ. जाधव, संदीप‎ कांबळे, प्राचार्या अनुराधा चव्हाण,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सविता सानप, सुचित्रा डावरे, स्वाती‎ कडनाेर उपस्थित होते.‎ या स्पर्धेत आदिती पवार, शिमा‎ शेख या विद्यार्थींनींनी ‘रोबोटिक सर्जरी‎ मॉडेल’सादर केले तर श्रुतिका‎ उपासणी, गायत्री ढवळे यांनी ‘ग्रीन‎ केमिस्ट्री’ तसेच इशान चिंतामणी व‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अभिजित देविकर यांनी कॅप्सुल‎ इंडोस्कोपी तर विक्रांत शिंदे, शुभम‎ वाळके यांनी ‘थ्रीडी होलोग्राम लोवा‎ लॅम्प’ व बालाजी घुले, तुषार गीत यांनी‎ ‘सीपीआर मॉडेल’साकारले या‎ मॉडेल मेकिंगला तृतीय क्रमांक‎ मिळवून या कॉलेजचे नाव उंचावले.‎

बातम्या आणखी आहेत...