आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:जगात देशसेवेइतके पवित्र कार्य कोणतेच नाही, आमदार कानडे यांचे प्रतिपादन

श्रीरामपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैनिकांनी देशासाठी दिलेली सेवा अमूल्य आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होणे अशक्य आहे. जगात देशसेवेइतके पवित्र कार्य कोणतेच नाही, असे प्रतिपादन आमदार लहू कानडे यांनी केले.

सेवानिवृत्त झालेल्या जवानांचा सन्मान सोहळा श्रीरामपूर येथील जय हिंद अॅकॅडमीने आयोजित केला होता. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार कानडे बोलत होते. यावेळी नायब सुभेदार राजमोहंमद शेख व मेजर संजय भोसले, मेजर किशोर कापसे, रवींद्र कुलकर्णी,बाबूलाल शेख, अशोकचे संचालक हिम्मतराव धुमाळ, विजय भोसले, मुकुंद इंगळे, मौलाना इमताज अली, अशोक भोसले, भारत तुपे, आयुब शेख, अकबर शेख, इस्माईल शेख, प्रमोद भोसले, शिवाजी भोसले, किरण गायधने, नूर शेख, अंजली पांगरे पुणे, कॉ जीवन सुरुडे, शरीफभाई शेख, अॅड. समीन बागवान, नईम शेख, शब्बीर शेख, इमरान शेख, त्रिदल सैनिक संघाचे मेजर कृष्णा सरदार, अनिल लगड, सुनील गवळी, दिलीप तांबे,आदी उपस्थित होते. आमदार कानडे म्हणाले, वीर जवानांना समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, त्यांचे देशासाठीचे योगदान सर्व लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे त्यासाठी असे कार्यक्रम समाजाने आयोजित करणे आवश्यक आहे. यासाठी जय हिंद अॅकॅडमीचे मोठे योगदान आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन तालुक्यात मोठे क्रीडा संकुल तयार करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या वर्षाअखेर ते काम पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली. तालुक्यातील भावी जवानांना याचा निश्चितच फायदा होईल असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...