आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:केडगाव वेस ते देवी रोडला‎ जोडणारा भुयारी मार्ग व्हावा

नगर‎10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केडगाव येथील नागरिकांच्या सोयीसाठी व‎ अपघात टाळण्यासाठी केडगाव वेस ते‎ देवी रोडला जोडणारा भुयारी मार्ग‎ करण्याची माघणी नगर सेविका लता‎ शेळके, गौरी ननावरे व नगरसेवक राहुल‎ कांबळे यांनी रस्ते वाहतूक व महामार्ग‎ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे‎ केली.‎ शहरातील उड्डाणपुलाच्या‎ उद्घटनानिमित्त नगरला आलेले केंद्रीय‎ मंत्री गडकरी यांची या नगरसेवकांनी भेट‎ घेऊन भुयारी मार्गाबाबत लक्ष वेधले.‎ शहराच्या विस्तारामुळे केडगाव वेस ते‎ देवी मंदिर रोड या रस्त्याचा वापर‎ वाढलेला आहे. हा रस्ता सर्वात जास्त‎ वाहतुकीसाठी वापरणार्‍या रस्त्यांपैकी एक‎ झाला आहे.

या रस्त्यालगत असलेल्या‎ प्रभाग क्रमांक १७ मधील हरिजन वस्ती,‎ कोतकर मळा, मोहिनीनगर, शास्त्रीनगर,‎ केडगाव देवी तसेच देवीच्या दर्शनासाठी‎ येणार्‍या भाविकांना नगर-पुणे महामार्गाच्या‎ वाहतुकीमुळे मोठ्या अडचणीचा सामना‎ करावा लागत आहे. तर यामुळे अनेक‎ लहान-मोठे अपघात घडत आहे. केडगाव‎ वेस ते देवी रोडला जोडणार्‍या मार्गावर‎ भुयारी मार्ग करण्यात यावी अशी या‎ भागातील नागरिकांची वारंवार माघणी होत‎ आहे.

केडगाव परिसरातून जाणारा‎ नगर-पुणे हा राज्यमार्ग मोठ्या वरदळीचा‎ झाला आहे. बरेचसे महाविद्यालय हे‎ केडगावमध्ये असल्यामुळे महाविद्यालयीन‎ विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना रस्ता‎ ओलांडताना तासंतास ताटकळत उभे‎ रहावे लागत आहे. तर हॉस्पिटलमध्ये‎ तातडीने रुग्ण घेऊन जाणे अवघड होत‎ असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...