आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रंगपंचमीनिमित्त रंगांची उधळण करत सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मिळून दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत आनंदोत्सव साजरा करत एकात्मतेचे दर्शन घडवले. ज्यांना रंगपंचमीचा रंग कोणता आहे हेच माहीत नाही, ते बघण्याची दृष्टीच नाही त्यांच्या जीवनात रंग भरण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने केला.
येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ आणि महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, निर्भय कन्या उपक्रम व आरोग्य समिती आयोजित (विशेष विद्यार्थी) दिव्यांग कार्यशाळा अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या कार्यशाळेनंतर रंगांची उधळण करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रो. डॉ. प्रभाकर डोंगरे होते. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहिदास भड़काव यांनी केले. याप्रसंगी सहशिक्षक ज्ञानेश्वर लोखंडे, सतीश देठे, आलम सय्यद, आरोग्य समिती चेअरमन डॉ. राम तांबे, प्रा. बाळ सराफ, डॉ. शिवाजी पंडित, डॉ. रामदास बोरसे, डॉ. नवनाथ शिंदे, प्रा. अश्विनी साळुंके, प्रा. माधुरी जेजुरकर आदी उपस्थित होते. कार्यशाळेत बाभळेश्वर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि अंध व कर्णबधिर विभागातील शंभर विद्यार्थी- विद्यार्थिंनींनी सहभाग घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.