आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी वृत्त:चक्क शवविच्छेदन केंद्र चोरट्यांनी फोडले ; केंद्राचे कुलूप तोडून आत प्रवेश

राहुरी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरीचे शवविच्छेदन केंद्र फोडून साहित्य बाहेर फेकून देण्याची घटना घडली. चोऱ्या घरफोड्यांच्या घटनाचे सत्र राहुरी तालुक्यात सुरू असताना चोरीसाठी चक्क शवविच्छेदन केंद्र फोडण्याची घटना चक्रावून टाकणारी ठरली.

मुळा नदीच्या पुलाजवळील शवविच्छेदन केंद्रात ही घटना घडली. चोरट्याने शवविच्छेदन केंद्राचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र हाती काहीच लागले नसल्याने शवविच्छेदन करण्यासाठी वापरात येणारे सुरा, सुया, दोरा, कात्री, रबरी हातमोजे व इतर साहित्य बाहेर फेकून दिले. कपाटाची चोरट्यांनी उचकापाचक करून आतील सामानाची फेकाफेक केली. नगर-मनमाड रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. लहान मोठ्या अपघाताच्या घटना कायमच घडत आहेत. अपघात तसेच इतर घटनांत मृत झालेल्या नागरिकांच्या मृतदेहावर विच्छेदन करण्यासाठी राहुरीत या केंद्राची व्यवस्था केली. मोठा अपघात घडल्यास या केंद्रात एकाचवेळी पाच ते सहा मृतदेहावर विच्छेदन करण्याचे बिकट प्रसंग यापूर्वी अनेकदा घडले. छोट्या आकारातील शवविच्छेदन केंद्रात कुठल्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने मृतदेहाचे विच्छेदन करणाऱ्या कर्मचाऱ्याला मोठ्या त्रासाला तोंड देण्याची वेळ येत आहे. शवविच्छेदन केंद्रालगत प्रशस्त रूमची व्यवस्था करण्याचे शहाणपण आरोग्य विभागातील अधिकारी व पुढाऱ्यांना आले नाही हे दुर्दैव आहे. शवविच्छेदन केंद्राच्या परिसरात साप, घुशी, उंदराचा सुळसुळाट असल्याने विच्छेदनासाठी ठेवण्यात आलेले मृतदेह कुरतडण्याच्या विटबंना होणाऱ्या घटना अनेकदा घडल्या.

बातम्या आणखी आहेत...