आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:कापडबाजारात चोरट्यांनी तीन दुकाने फोडली

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापड बाजारातील तीन दुकाने चोरट्यांनी फोडली. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी अडीच लाखांच्य रोख रकमेसह शूज, सॉक्स, लॅपटॉप, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह असा २.६४ लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी प्रसन्न राजकुमार मुथा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.

शुक्रवारी रात्री नगर शहरासह उपनगरात दहीहंडीचा जल्लोष होता. बहुतांश पोलिस कर्मचारी या बंदोबस्तात होते. याचीच संधी साधत चोरट्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कापडबाजारात तीन दुकानांमध्ये चोरी केली. मुथा ड्रेसेस, मुथा कलेक्शन व चरण शूज या दुकानांतून चोरट्यांनी ऐवज लंपास केला. मुथा कलेक्शन येथून २ लाख, मुथा ड्रेसेस येथून ४५ हजार व चरण फूट वेअर येथून ८ हजार रुपये रोख, तसेच तिन्ही दुकानातून लॅपटॉप, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, शूज, सॉक्स असा २.६४ लाखांचा ऐवज चोरून नेला. दुकानाचे सिक्युरिटी डोअर व डिजिटल लॉकर तोडून रोख रक्कम पळवली.

या घटनेची माहिती मिळताच शहर विभागाचे उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी श्वान पथकासही पाचारण केले आहे. चोरट्यांच्या शोधासाठी कोतवाली पोलिसांची दोन पथके रवाना झाली. या घटनेसंदर्भात दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...