आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारला डल्ला:शिबलापूर शिवारामध्ये चोरट्यानी सोयाबीनच्या गोण्यावर मारला डल्ला

पिंपरणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर शिवारात ३६ हजार रुपये किमंतीचे सोयाबीन चोरीस गेल्यामुळे सीताराम बाळकृष्ण नागरे या शेतकऱ्यावर मोठे अर्थिक संकट कोसळले. शिबलापूर - पानोडी रस्त्यावर शेतकरी बाळकृष्ण नागरे यांची शेती व वस्ती आहे. त्यानी शेतातून चार-पाच दिवसांपूर्वी सोयाबीन काढणी करून ८ गोण्यांमध्ये भरून वस्तीवरील शेडमध्ये ठेवली होती. मात्र, सोमवार (३१ ऑक्टोबर) सकाळी रोजच्याप्रमाणे शेडमध्ये पाहिले असता शेडमध्ये ठेवलेल्या सोयाबीनच्या ८ गोण्या अंदाजे ३६ हजार रुपये किमतीचे सोयाबीन चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले.

त्यामुळे त्यानी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रविवारी (३० ऑक्टोबर) मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास सोयाबीन गोण्याची चोरी करताना दोन चोरटे त्याना दिसून आले आहेत. अगोदरचं नैसर्गिक आपत्तीमध्ये मोठ्या कष्टाने सोयाबीनचे शेतकऱ्याने उत्पादन घेतले. विक्रीसाठी साठवून सोयाबीन ठेवली असता चोरट्यांनी ही ती सोयाबीन चोरुन नेली. आसमानी संकटाबरोबरचं सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यानवर आली असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

दरम्यान, आश्वी पोलिस ठाण्यात याबाबत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. पवार या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. चोरट्यानी आता थेट शेतकऱ्याच्या शेतमालाकडे मोर्चा वळवल्यामुळे शिबलापूरसह पंचक्रोशीतील शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र निर्माण झाले.

बातम्या आणखी आहेत...