आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार नीलेश लंकेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस:रास्ता रोको आंदोलन; पाथर्डीत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयातील खुर्ची पेटवली

अहमदनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महामार्गांच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच होते. त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये शुक्रवारी (9 डिसेंबर) ला रास्ता रोको आंदोलने झाली.

पाथर्डी येथे शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग विभागातील खुर्ची पेटवण्यात आली. दरम्यान उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे विरोधी पक्ष नेते अजित पवार शनिवारी अहमदनगर मध्ये येऊन उपोषण स्थळी आमदार लंके यांची भेट घेणार आहेत.

राष्ट्रीय महामार्गांची दुरुस्ती तातडीने करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी बुधवार ( 7 डिसेंबर) पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गेल्या तीन दिवसापासून हे उपोषण सुरू असून, उपोषणात एडवोकेट हरिहर गर्जे, क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष सतीश पालवे, आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. लंके यांच्या उपोषणाचा शुक्रवारी तिसरा दिवस होता. त्यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी ,करंजी, तिसगाव, खरवंडी ,मिडसांगवी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर पारनेर तालुक्यातील सुपा, टाकळी ढोकेश्वर येथे देखील रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर तालुक्यातील चास, शेंडी ,चिंचोडी पाटील, शिराळ या रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. पाथर्डी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यालयातील खुर्ची पेटवून देण्यात आल्याने हिंसक वळण या उपोषणाला मिळाले आहे. दरम्यान जोपर्यंत रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू होत नाही तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील असे आमदार लंके यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

वाळूवर दंडात्मक कारवाई केल्यामुळे बचाव करण्यासाठी ते विखेंची वकिली करत आहेत. उपोषणात सहभागी झालेले आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड म्हणाले, एक वाळू चोर ,एक भ्रष्ट ठेकेदार तोच भाजपचा जिल्हाध्यक्ष आहे. त्यांनी स्वतःचे कांड तपासून घ्यावे. वाळूचा व्यवसाय त्यांचा आहे. त्यांच्या व्यवसायावर दंडात्मक कारवाई केल्यामुळे बचाव करण्यासाठी ते विखेंची वकिली करत आहेत. असा आरोप त्यांनी करून न्यायालयात या प्रकरणी दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले. तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष सतीश पालवे यांनी मुंडे यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा सवाल करून त्यांनी मेंदू विकार तज्ञांकडून त्यांचे डोके तपासून घ्यावे असा आरोप केला.

बातम्या आणखी आहेत...