आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातरुणांना नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ८६ लाख २८ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद कोतवाली ठाण्यात दाखल झाली . यासंदर्भात श्रीगोंदे तालुक्यातील सौरभ शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दिनेश लहारे (हनुमान नगर, अरणगाव), रमजान शेख (रा. टाकळी खातगाव, ता. नगर) आणि जावेद पटेल (रा. गंगापूर ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रभ शिंदे हे बेरोजगार आहेत. त्यांनी सैन्यदलात नोकरी लावण्यास कराड येथील अॅकॅडमीत प्रवेश घेतला होता. पण नोकरी लागली नाही.
आरोपी शेख याने सौरभ याला तुला नोकरी लावून देतो, पण पैसे द्यावे लागतील असे सांगितले. त्यामुळे फिर्यादी शिंदे यांनी आरोपीला वेळोवेळी एकूण १५ लाख रुपये दिले. आरोपी शेख याला लहारे व पटेल यांनी साथ दिली. पैसे घेवुन नोकरी तर दिलीच नाही तसेच पैसेही परत केले नाहीत, असे फिर्यादीत म्हटले आहे. शिंदे यांनी त्यांचे मित्र स्वप्नील शिंदे (४ लाख), कुलदिप लगड (४ लाख ६० हजार), वैभव शिंदे (५.२९ लाख ), सिध्दार्थ भिंगारदिवे (५.३५ लाख ), अभिजित तुपे (४.७० लाख ), अतुल धोंडे (४ लाख ३५ हजार), सागर अनारसे (४ लाख ३५ हजार), प्रफुल्ल वैराळ (४ लाख ४० हजार), प्रशांत वाघमारे (५ लाख ४५ हजार), गोविंद तुपे (४ लाख ९५ हजार), पायल भिंगारदिवे (६ लाख १५ हजार), संदीप शिंदे (४ लाख २४ हजार), जालींदर खेतमाळीस (७ लाख ७५ हजार) अशी एकूण ७१ लाख २८ हजार व फिर्यादीचे १५ लाखांची फसवणूक झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.