आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुडाच्या व जिरवाजिरवीच्या राजकारणाने सर्वसामान्यांचे प्रश्न दुर्लक्षीत केले जात आहेत. जिवंत माणसांना सोयी-सुविधा पुरविण्यापेक्षा मरणानंतरच्या स्मशानभूमीसाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यास मनपा प्रशासन सरसावली आहे. सावेडी येथील ३२ कोटीची स्मशानभूमी म्हणजे मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे. खड्डेमय व धुळीने माखलेले रस्त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी भलेतच प्रश्न गंभीर वाटू लागल्याने या विरोधात रिपाई देखील आंदोलनाच्या भूमिकेत असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (गवई) शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी केले.
पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील उद्योजक प्रकाश बठेजा यांनी प्रवेश केला. यावेळी म्हस्के बोलत होते. बठेजा यांचे पक्षात स्वागत करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दानिश शेख, गुलाम शेख, संतोष पाडळे, जमीर सय्यद, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, सचिन शिंदे, नईम शेख, जमीर इनामदार, निजाम शेख, आजीम खान, ऋषिकेश विधाते, शिवम साठे, बंटी बागवान, जावेद सय्यद, दिनेश पाडळे,भिम वाघचौरे, हुसेन चौधरी, आदिल शेख, सोहेल शेख, उमेश गायकवाड, अक्षय चाबुकस्वार, आदेश पाडळे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.