आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर काँग्रेस मजबुत:म्हणून राष्ट्रवादीचेे आमदार संग्राम जगताप पक्ष फोडण्यासाठी प्रयत्न करताय, मनोज गुंदेंचा आरोप

अहमदनगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहरात यापूर्वी दिवंगत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांची शिवसेना फोडण्यासाठी शहराचे आमदार आटापीटा करायचे, परंतु, आता काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांना आव्हान निर्माण झाले. त्यामुळे आता काळेंची काँग्रेस फोडण्यासाठी शहरातील आमदारांचा आटापीटा सुरू आहे, हाच शहर काँग्रेस भक्कम झाल्याचा पुरावा आहे, असा टोला शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी लगावला.

काँग्रेसचे माजी शहर उपाध्यक्ष अनंत गारदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यापार्श्वभूमीवर गुंदेचा म्हणाले, गारदे अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. त्यांना काँग्रेसमध्ये पद देऊन त्यांचा सन्मान केला. परंतु, त्यांच्यावर दबाव होता. काँग्रेस फोडण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आटापीटा सुरू आहे. गारदे यांनी पक्षनिष्ठा न पाळता ते दहशतीपुढे झुकले. मैदान सोडण्याच्या कृतीमुळे गारदे यांना राजीनामा देण्याचे आदेश शहर जिल्हा काँग्रेसने दिले होते. त्यानुसार हकालपट्टीच्या भितीपोटी गारदे यांनी राजीनामा दिला. काळेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पळपुट्यांचा पक्ष नाही. काँग्रेसची जोरदार बांधणी शहरात सुरू आहे. समाजवादी पक्षाच्या नगरसेवकाच्या प्रवेशानंतर अनेक चांगले चेहरे संपर्कात आहेत. लवकरच त्यांचा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश होईल, असे गुंदेचा यांनी सांगितले.

काँग्रेसला धक्का का ?

शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष अनंत गारदे यांनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह पक्षाला धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत मुंबई येथे गारदे यांनी प्रवेश केला.गारदे यांनी प्रवेश करताच त्यांची, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करुन राष्ट्रवादीच्या उद्योग आणि व्यापार विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधातेही उपस्थित होते.अनंत गारदे हे शहराच्या राजकारणात मागील तीस ते पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. ते काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत होते. महिनाभरापूर्वी दोन्ही पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा देण्यामागे नेमकी कोणती नाराजी होती, याबाबत कोणताही खुलासा झाला नाही. दरम्यान, सोमवारी (२० जून) गारदे यांनी मुंबईत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला

आमदारांचे व्हिजन भावले

नगर शहराचे आमदार संग्राम जगताप, तरूण असून त्यांच्याकडे कामाचे व्हिजन आहे. मलाही सामाजिक कार्याची आवड असून आमदारांचे व्हिजन मला भावल्याने मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. असे अनंत गारदे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला, कामाला सुरूवात करण्याचे सांगितले. त्यानुसार मी जोमाने काम करून राष्ट्रवादी पक्ष संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असेही त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...