आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:थोरात कारखाना सेवकांच्या पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

संगमनेर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना सेवकांच्या सहकारी पतसंस्थेने बिनविरोधची परंपरा कायम राखली असून २०२२-२७ सालाची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, संचालक इंद्रजीत थोरात, संपत गोडगे, उपसभापती नवनाथ अरगडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सेक्रेटरी किरण कानवडे, भास्कर पानसरे, केशव दिघे यांच्या उपस्थितीत राहणे रामदास, थोरात सुभाष, काकड बाळासाहेब, देशमुख शरद, बढे एकनाथ, राऊत राजेंद्र, देशमुख अतुल, कोल्हे संदीप, गिरी रमेश, जोंधळे राहुल, लोहाळे दत्तात्रय, चव्हाण संजय व मस्के बाळासाहेब आदींच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर व आमदार बाळासाहेब थोरात त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या कारखान्याच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेने कामगारांच्या जीवनात आर्थिक समृद्धी निर्माण करण्याचे काम केले आहे. पतसंस्थेचा व्यवहार उत्तम असून ऑडिटचा ‘अ’ दर्जा आहे. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून योगेश कापसे यांनी तर सहाय्यक म्हणून मॅनेजर विजय खेमनर व संजय शिरतार यांनी काम पाहिले.

नवनिर्वाचित संचालकांचे आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, सत्यजित तांबे,रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...