आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:थोरात यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे 4 कोटी 50 लाखाच्या निधीची मागणी

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील वर्षी तालुक्यात पडलेल्या अति पावसामुळे साई नगर व गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळुंगी नदीवरील पूल खचला होता. धोकादायक बनलेल्या पुलावरून शाळकरी मुल, वृद्ध नागरिक जीवघेणा प्रवास करत असताना याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी लक्ष घालून पुलाच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ४ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. शासकीय मान्यता मिळताच लवकरच नवीन पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

साई नगर, साई मंदिर, प्रवरा नदी, गंगामाई घाट, कासारवाडीला जाण्यासाठी व ओहरा महाविद्यालय त्याच भागात असल्याने विद्यार्थी, पालक व नागरिकांसाठी म्हाळुंगी पुल महत्वाचा आहे. ऑक्टोबरमध्ये म्हाळुंगीला तीनदा पूर आल्याने सततच्या पाण्यामुळे पूल खचला होता. ड्रेनेजची लाईन तुटून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईन उखडल्या होत्या. घोडेकर मळ्यात जाणारा पाईप पूलही वाहून गेल्याने रहदारीला मोठ्या अडचणी आल्या.

साई नगरमधील नागरिकांनी पूल दुरुस्तीसाठी आंदोलन केल्याने घोडेकर मळ्यात जाणारा तात्पुरता पूल पालिकेने बांधला. मात्र, त्याचा उपयोग काही प्रमाणात झाला. मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गा तांबे यांनी पुलाची पाहणी करून मुख्याधिकारी राहुल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. आर. वर्पे यांना दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...