आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांना ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवार्ड’ गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा सन २०२१-२२ हा उद्योग उत्कृष्टता पुरस्कार (इंडस्ट्री एक्सलन्स अवार्ड) घुगरकर यांना पणजी येथील शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये देण्यात आला. माजी केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन, संजय अवस्थी, रणजीत पुरी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, सहकार चळवळीत नगर जिल्ह्याचा मोठा वाटा आहे. थोरात कारखान्याने कायम दिशादर्शक काम केले आहे. घुगरकर म्हणाले, आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यात सहभाग घेतला, याचा आनंद आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.