आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून भूमिका बदलणाऱ्यांनी शिवसेनेवर बोलू नये

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात राष्ट्रवादीत जाऊन फिरून आलेले शिवसेनेवर बोलून दिशाभूल करत आहेत. स्वत;ची लफडी मिटवण्यासाठी जे स्वत; राष्ट्रवादीच्या कंपूत जाऊन बसत होते, त्यांच्या सांगण्यावरुन भूमिका व रंग बदलत होते, त्यांनी शिवसेनेवर बोलूच नये, असा टोला शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम यांनी शिंदे गटाचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांना लगावला.

दसरा मेळाव्याला जाण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना राष्ट्रवादीकडून गाड्या दिल्या जात असल्याची टीका जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना कदम यांनी जाधव व शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनाही टोला लगावला. आपण स्वत;चे गणेश मंडळ वाचवू शकले नाही, त्यामुळे आपण आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नये, अशा शब्दात त्यांनी शिंदे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मेळाव्याला जाण्यासाठी शिवसेनेला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही. तुम्हाला खोके आल्यामुळे तुम्ही आवाज करत आहात. त्या खोक्यात बसवून कार्यकर्ते नेण्याचा प्रयत्न करत आहात. शिवसेनेतून ज्यांना जायचे, त्यांना मार्ग मोकळा आहे. जे आजही शिवसेनेत आहेत, ते मनाने शिवसैनिक आहेत व ते शिवसेनेतच राहतील. आम्हाला कोणत्याही प्रकारचे खोके वरतून आलेले नाही. त्यामुळे शिवसैनिक स्वत; च्या खर्चाने मेळाव्याला जाणार आहे.

जिल्ह्याच्या दक्षिण व उत्तर भागातून असे संपूर्ण जिल्ह्यातून १० हजार शिवसैनिक मेळाव्याला जाणार आहेत. दरवर्षी जिल्ह्यातील शिवसैनिक या मेळाव्याला जातातच. दसरा मेळाव्याची धडकी शिंदे गटाला भरली आहे. त्यामुळे लवकरच नगरसेवक आमच्याकडे येतील, सात ते आठ नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, अशी भंपक वक्तव्ये ते करीत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

शिवसेनेच्या चिन्हावर लढायची भिती वाटायची
प्रभागात शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवायला सचिन जाधव यांना भिती वाटत होती. आज ते स्वत;ला वाघ समजून पोकळ डरकाळ्या देत आहेत. ज्यांना शिवसेनेने मोठे केले, तेच आज शिवसेनेच्या व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंबीर खूपसून पळ काढत आहेत. शिवसैनिक व नगरकर यांच्या भंपकबाजीला भुलत नसल्याने शिंदे गट सध्या वैफल्यग्रस्त झाला आहे. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न ते करत असल्याचा टोलाही कदम यांनी लगावला

बातम्या आणखी आहेत...