आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:विद्यार्थिंनींची छेड काढणाऱ्यांना‎ कडक शिक्षा करू : पूजारी‎

शेवगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा, महाविद्यालयात येणाऱ्या‎ विद्यार्थिंनींची छेड काढणाऱ्यांना‎ कडक शिक्षा करण्यात येईल, असा‎ इशारा शेवगाव पोलिस स्टेशनचे‎ पोलिस निरिक्षक विलास पुजारी यांनी‎ दिला.‎ ढोरजळगाव येथील श्रीराम‎ विद्यालय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन‎ करताना पुजारी बोलत होते. पुजारी‎ म्हणाले, मुला मुलींनी मोबाईल‎ वापरणे बंद करावे. सध्याच्या‎ आधुनिक युगात नको त्या गोष्टी या‎ मोबाइलमुळे घडत आहेत.

आपल्या‎ मुलांना पालकांनी मोबाइल देऊ नये.‎ कुठल्याही चुकीला आपल्या‎ पाल्याला पालकांनी पाठीशी न घालता‎ शिक्षा केली, तर पाल्य चांगला‎ नागरिक घडू शकतो.‎ जिद्द, चिकाटी असेल तर प्रतिकुल‎ परिस्थितीतही विद्यार्थी प्रयत्न व‎ अभ्यासाच्या जोरावर प्रशासकीय‎ आधिकारी होऊ शकतो. यासाठी‎ कॉपी न करता कॉपीमुक्त वातावरणात‎ परीक्षा घ्याव्यात शाळेत कुठलेही‎ वाईट कृत्य केल्यास कडक शासन‎ करण्यात येईल मुलींनी न घाबरता न‎ डगमगता प्रतिकार केला. वेळीच‎ आवाज उठवला तर अशा घटना‎ घडणार नाहीत.

कुठल्याही विद्यार्थ्याने‎ गैरवर्तन केल्यास त्याला कडक शासन‎ केले जाईल, असे पुजारी म्हणाले.‎ याप्रसंगी शेवगाव पोलीस स्टेशनचे‎ गोपनीय शाखेचे अंमलदार बप्पासाहेब‎ धाकतोडे व इतर कर्मचारी उपस्थित‎ होते.‎ शालेय वेळेत बाहेरगावाहून‎ विद्यालय येणाऱ्या मुलींना‎ रोडरोमिओंचा त्रास होऊ नये यासाठी‎ शालेय दक्षता कमिटीची स्थापना‎ करण्यात आली. त्यात गावातील‎ प्रतिष्ठित व्यक्ती, पालक यांची‎ नियुक्ती करण्यात आली.

यावेळी‎ राजेंद्र देशमुख,महादेव पाटेकर,‎ अनंता ऊर्किडे, गणेश कराड, प्राचार्य‎ कांतेश्वर ढोले, पर्यवेक्षक सुनील‎ आव्हाड, बीट हवालदार रामेश्वर घुगे,‎ संभाजी लांडे, बाळासाहेब पाटेकर,‎ देवीदास देशमुख, देविदास गिऱ्हे,‎ कैलास देशमुख, सूर्यकांत गाडगे,‎ गणेश पाटेकर, संभाजी देशमुख,‎ संभाजी फसले, पत्रकार दीपक खोसे,‎ कमलाकर गरड, रोहन साबळे,‎ कृष्णकांत पाटेकर, आकाश साबळे‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...