आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जात आहे. हळदी-कुंकू कार्यक्रमात एकत्र येताना, महिलांनी विचारांचा जागर करणे आवश्यक आहे. एकमेकींचे सुख, दु:ख जाणून घेताना, समाजात स्त्रियांच्या प्रश्नावर विचार मंथन होऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मीनाली काबरा यांनी केले. प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकपरंपरा व संस्कृतीचा जागर करण्यात आला. मराठमोळ्या वेशभूषेत या कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला. महिलांचे यावेळी रंगलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धेतून आपल्या कल्पकतेचा अविष्कार घडविला. एकमेकींना हळदी-कुंकू लावून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कीर्ती शिंगवी, उषा शिंगवी व शोभा काबरा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ग्रुपच्या अध्यक्षा अलका मुंदडा, प्रवीणा घैसास, प्रिया आठरे, सविता गांधी, ज्योती कानडे, साधना भळगट, शोभा पोखरणा, मनीषा देवकर, हिरा शहापुरे, जयश्री पुरोहित, शकुंतला जाधव, दीपा सोनी, सुजाता पुजारी, पुष्पा मालू, तारा लढ्ढा, रेखा फिरोदिया, स्वप्नाली शिंगी, स्वाती गुंदेचा, उषा गुगळे आदींसह ग्रुपच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. प्रास्ताविकात अलका मुंदडा यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पाहुण्यांचे स्वागत प्रवीणा घैसास यांनी केले. प्रारंभी सोनल तरटे यांनी गीतांवर नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजन, कौशल्यात्मक व बौध्दिक स्पर्धा रंगल्या होत्या. दीपा मालू यांनी घेतलेल्या विविध स्पर्धेत महिलांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला. विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. सूत्रसंचालन सारिका कासट यांनी केले. आभार दीप्ती मुंदडा यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.