आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरातून शेकडो पायी दिंड्यांची हजेरी:हजारो भाविकांनी घेतले पैस खांबाचे दर्शन

नेवासे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कार्तिक वद्य उत्पत्ती एकादशीच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील माऊलीच्या पैस खांबाचे दिवसभरात सुमारे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी पायी आलेल्या शेकडो दिंड्यांनी हजेरी लावली. मंदिरात पहाटे ४ वाजता संत ज्ञानेश्वर मंदिराचे शिवाजी महाराज देशमुख यांच्या बरोबर उपस्थितीत त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाचे मनीष घाडगे व मनिषा घाडगे यांच्या हस्ते माऊलीचे “पैस” खांबास अभिषेक घालण्यात करण्यात आला. यावेळी विश्वत मंडळ व डॉ. करण घुले उपस्थित होते.

पहाटे पाच पासुनच भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी दर्शन बारी लागली होती संत ज्ञानेश्वर मंदिराबरोबर मोहिनीराज,संत तुकाराम महाराज मंदिरात गर्दी झाली होती बाजार बंद असल्याने गर्दीचा प्रभाव जाणवला नाही. मंदिराच्या विश्वत मंडळाने चांदीच्या पादुका ठेवून बाहेरून दर्शनाची सोय केली होती. यावेळी नेवासा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...