आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी:शिरच्छेद करून दुकानावर बुलडोझर चालवण्याची धमकी ; कोतवाली पोलिसांनी केली गुन्हाची नोंद

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुकान बंद करण्याचे सांगूनही दुकान बंद न केल्याच्या रागातून केडगावच्या सलून व्यावसायिकास शिरच्छेद करण्याची व त्याच्या दुकानावर बुलडोझर चालवण्याची धमकी देण्यात आली आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, नुपूर शर्माच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आयोजित बंदमध्ये भाग घेतला नाही, म्हणून ही धमकी दिली का, या शोध पोलिस घेत आहेत. याप्रकरणी शकील शेख (वय २९, रा. एकनाथ नगर, नेप्ती रोड, केडगाव) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. १२ जून रोजी सकाळी शेख यांच्या मोबाइलमधील पाचपीर बाबा दरगाह कमेटी नावाच्या ग्रुपवर सिराज शेख या व्यक्तीने, शकील शेख यांना दुकान बंद ठेवण्याबाबत सांगूनही दुकान चालू ठेवून आमच्या भावना दुखावल्या, अशा आशयाचा मेसेज टाकला. त्यानंतर अझीम राजे, राऊफ खान साहब यांनी देखील शिरच्छेद करण्याची धमकी दिली. तसेच वाहिद सय्यद, गफार शेख, तन्वीर शेख यांनी देखील तुमच्यावर लानत आहे, यांच्या दुकानावर बुलडोजर चालवा, असा मेसेज टाकून धमकी दिली. १३ जून रोजी दुपारी दोन अनोळखी व्यक्ती तोंडाला काळे कपडे बांधून दुकानात आल्या व त्यांनी शेख यांच्या दुकानाच्या समोरील भागात लावलेले काचेचे गेट फोडले. आज दुकान फोडले, उद्या तुला फोडू, अशी धमकी देऊन दांडक्याने मारले व पळून गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...