आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:मुलीला फोटो व्हायरल करण्याची धमकी; एकावर गुन्हा दाखल

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘फ्रिफायर’ गेमद्वारे ओळख झालेल्या मैत्रिणीकडे लग्नाची मागणी करून लग्न न केल्यास तिचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणाविरुध्द तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीची एक वर्षापूर्वी ‘फ्रिफायर’ गेमद्वारे एका तरुणाशी ओळख झाली. त्यांच्यात मैत्री झाली. २५ मे रोजी तरुणाने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करून, ‘तुमची मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे, माझे तिच्यावर प्रेम आहे’, असे म्हणून फोन बंद केला. तरुणाने फिर्यादी यांच्या घरच्या मोबाईलवर फोन करुन ‘तुमच्या मुलीचे लग्न माझ्यासोबत करून द्या, तुम्ही जर आमचे लग्न लावून दिले नाही, तर तुमच्या मुलीची बदनामी करेल, मुलीचे अश्लिल फोटो काढून व्हायरल करेल, अशी धमकी दिली.

बातम्या आणखी आहेत...