आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:व्यापाऱ्याला दुचाकीवरून खाली पाडत साडेतीन लाखांची रोकड पळवली

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीवरून घराकडे जाण‍ाऱ्या व्यापाऱ्याला कट मारून झाली पाडत त्याच्याकडील सुमारे तीन ते साडेतीन लाख रूपयांची रोकड दोन चोरट्यांनी लंपास केली. पत्रकार चौक ते तारकपूर बस स्थानकाकडे जाणाऱ्या रोडवर मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता ही घटना घडली. या प्रकरणी व्यापारी सुनील लालचंद सिरवानी (वय ४१, रा. सिंधी कॉलनी, तारकपूर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखीविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिरवानी यांची दाळ मंडईमध्ये खाद्य तेलाचे, दाळीचे व तांदुळाची बी.जी.आर. ट्रेडिंग कंपनी आहे.

दुकानातील जमा झालेली तीन ते साडेतीन लाख रुपयांची रक्कम असलेली बॅग त्यांनी मोपेड दुचाकीच्या डिक्कीत ठेवली. ते घराकडे जात असताना पत्रकार चौक ते तारकपूर रस्त्यावर मराठा मंदिर सायकल सेंटरच्या समोर दुचाकीवरील दोघांनी त्यांना कट मारून खाली पाडले. त्यातील एकाने सिरवानी यांना बाजूला धरून ठेवले तर दुसऱ्याने दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली पैशाची बॅग ताब्यात घेतली व दोघा चोरट्यांनी डीएसपी चौकाच्या पळ काढला, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अधिक तपास पोलिस करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...