आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ल्यात जखमी:होमगार्ड अधिकाऱ्यावर तिघांचा हल्ला

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलाला मारहाण होत असल्याने भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या होमगार्ड अधिकाऱ्यावर तिघांनी लाकडी दांडके, दगडाने हल्ला केला. या हल्ल्यात होमगार्ड अधिकारी जखमी झाले आहेत.

रावसाहेब जगन्नाथ आव्हाड (वय ४५ रा. गाडेकर चौक, सावेडी) असे जखमी अधिकार्‍याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून दीपक तांदळे, अशोक गिते, गणेश कांबळे (सर्व रा. भगवान बाबा चौक, निर्मलनगर, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...