आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकार्यकाळ पूर्ण झालेल्या भाजपचे नगर जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्ष बदलण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या १६ मे रोजी नगर शहर, नगर दक्षिण व नगर उत्तर जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष बदलणार आहेत. तत्पूर्वी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी (३ मे) जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत नगर जिल्ह्यातील चार पदाधिकाऱ्यांचा समावेश केला आहे.
नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांना प्रदेश चिटणीस पद देण्यात आले आहे. प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्येष्ठ नेते अभय आगरकर, जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे व माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, नगर शहर जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष भैय्या गंधे यांच्यासह माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा आहे.
मात्र, शहर जिल्हाध्यक्ष पद आपल्या गटाकडे ठेवण्यासाठी विखे गटाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. सर्वाधिक इच्छुक नगर शहराध्यक्ष पदासाठी आहेत. भाजपचे विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी शहराध्यक्ष पद पुन्हा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या सर्वाधिक असली, तरी कुठल्या नावावर प्रदेश पातळीवरून शिक्कामोर्तब होणार, हे १६ मे नंतरच स्पष्ट होणार आहे.
नगर उत्तर जिल्हा भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर या पदासाठी पुन्हा इच्छुक असले, तरी उत्तरेतून नवीन जिल्हाध्यक्ष पदासाठी विखे गट आग्रही आहे. जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांच्यासह प्रकाश चित्ते यांचेही प्रयत्न सुरू आहेत. नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांची प्रदेश कार्यकारिणी चिटणीस पदावर नियुक्ती झाल्याने दक्षिणेतून अनेक जणांनी त्यांच्या जागेवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
बाळासाहेब महाडिक, दिलीप भालसिंग यांच्या नावाची चर्चा आहे. मुंढेकडे धुळे, मालेगाव नव्याने जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यावर चिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. मालेगाव व धुळे जिल्हाध्यक्ष निवडीचीही प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. पक्षाने शहर अध्यक्षपद दिले, तर निश्चितपणे पक्षाचे काम करील, अशी प्रतिक्रिया माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
विखे गटाची मोर्चेबांधणी भाजपचे तीनही जिल्हाध्यक्ष बदलणार असल्याने विखे गट सक्रिय झाला आहे. उत्तरेचे जिल्हाध्यक्ष, नगरचे शहराध्यक्ष आपल्या गटाचा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विखे गटाविरुद्ध भाजपचे निष्ठावंत असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
मुंढेकडे धुळे, मालेगाव नव्याने जाहीर झालेल्या प्रदेश कार्यकारिणीत दक्षिणचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्यावर चिटणीस पदाची जबाबदारी दिली आहे. मालेगाव व धुळे जिल्हाध्यक्ष निवडीचीही प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे. पक्षाने शहर अध्यक्षपद दिले, तर निश्चितपणे पक्षाचे काम करील, अशी प्रतिक्रिया माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली.
विखे गटाची मोर्चेबांधणी
भाजपचे तीनही जिल्हाध्यक्ष बदलणार असल्याने विखे गट सक्रिय झाला आहे. उत्तरेचे जिल्हाध्यक्ष, नगरचे शहराध्यक्ष आपल्या गटाचा करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विखे गटाविरुद्ध भाजपचे निष्ठावंत असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.