आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजाआड:अपहरण करत खंडणी मागणारे तिघे गजाआड ; स्थानिक गुन्हे शाखेच्या वतिने झाली कारवाई

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिस्तुलाचा धाक दाखवून अपहरण करत खंडणीची मागणी करणाऱ्या तीन आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींकडून दहा लाख रूपयांची गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार जप्त केली आहे. किरण उर्फ दत्तात्रय नानाभाऊ दुशिंग (वय २७, रा. उंबरे, ता. राहुरी), सुधीर संपत मोकळ (वय २३, रा. पारेगाव, ता. कोपरगाव) आणि संदीप उर्फ बंडु रंगनाथ कोरडे (वय ३२, रा. घोगरगाव, ता. श्रीगोंदे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना मुद्देमालासह संगमनेर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. २७ एप्रिल रोजी फिर्यादी भाऊसाहेब देव्हारे यांचे आरोपी किरण दुशिंग याने साथीदारांच्या मदतीने अपहरण करून ४८ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल आरोपींनी काढून घेतला होता. साडेतीन लाखांच्या खंडणीची मागणी केली होती. फिर्यादीने लोहारे गावातील मंदिरासमोर गर्दी पाहिल्यानंतर आरडाओरड केल्याने गावकऱ्यांनी गाडी अडवताच आरोपी पसार झाले होते. या प्रकरणी संगमनेर तालुका ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आरोपी किरण दुशिंग राहुरीत येणार असल्याची माहिती निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने दुशिंगला ताब्यात घेतले. त्याने आरोपी मोकळ आणि कोरडे यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर मोकळ याला गणेश नगर (ता. संगमनेर) येथून तर कोरडे याला घोगरगाव येथून ताब्यात घेतले. आरोपी दुशिंगने स्विफ्ट गाडी त्याने मध्यप्रदेशातून चोरल्याची कबुली दिली. दुशिंगविरूद्ध ११, मोकळविरूद्ध दोन तर कोरडेविरूद्ध तीन गंभीर गुन्हे विविध ठाण्यांत दाखल आहेत.

बातम्या आणखी आहेत...