आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सूनच्या पावसाने नगर जिल्ह्यात घेतले 4 बळी:संगमनेर तालुक्यात घर कोसळून एकाच कुटुंबातील तिघे ठार; झाड पडल्याने महिलेचा मृत्यू

अहमदनगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरसह अन्य तालुक्यात गुरुवारी (ता. 9) वादळी वारा आणि विजेच्या कडकडाट्यांसह मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. संगमनेर तालुक्यात राहते घर पडल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला तर अकोले तालुक्यातील रहिवाशी असलेल्या महिलेचा संगमनेर तालुक्यातच झाड पडल्याने मृत्यू झाला आहे.

आपत्ती विभागप्रमूखाची माहिती

मृग नक्षत्रातील पहिल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले असून या पावसामुळे झालेल्या पडझडीत चौघांचा मृत्यू झाला, ‌अशी माहिती अहमदनगर आपत्ती विभागाचे प्रमुख डॉ.वीरेंद्र बडदे यांनी गुरुवारी रात्री दिली.

एकाच कुटुंबातील तिघांवर घाला

संगमनेर तालुक्यातील अकलापुर येथे वादळी वाऱ्याचा पावसामुळे राहते घर पडल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अकलापुर येथे राहते घर पडल्याने विठ्ठल भीमा दुधवडे, हौसाबाई भीमा दुधवडे, साहिल दुधवडे या तीन जणांचा मृत्यू झाला अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

झाड पडून महिला ठार

अकोले तालुक्यातील रहिवासी असलेल्या सुरेखा राजू मधे या महिलेचा मालदाड येथे वाऱ्याच्या पावसात अंगावर झाड पडल्याने मृत्यू झाला आहे. अहमदनगर शहर व जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसापूर्वी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. रविवारी देखील काही भागात हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला होता. दरवर्षी अहमदनगर शहर व जिल्ह्यात एक जून पासून मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होते.

यंदा मात्र विलबंनाने शहर व परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी रात्री अहमदनगर शहरातील सर्जेपुरा, माळीवाडा, चौपाटी कारंजा, दिल्ली गेटसह उपनगरातील सावेडी, केडगाव, पाईपलाइन रोड, भिंगार, नवनागापूर, औरंगाबाद रोड या भागात हलका पाऊस झाला. गुरुवारी देखील नगर जिल्ह्याच्या काही भागात मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर सह अन्य जिल्ह्यात गुरुवारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला या पावसामुळे अनेक भागात नुकसान झाले आहे.

दोन वर्षात प्रथमच मान्सूनला विलंब

अहमदनगर जिल्ह्यात 2020 मध्ये सरासरी 767 मिलिमीटर पाऊस आला होता. तर 2021 मध्ये सरासरी 566 मिलिमीटर पाऊस झाला होता. गेल्या दोन वर्षांमध्ये 1 जुन पासूनच मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली होती. यंदा मात्र 1 जून हा कोरडा गेला होता.

बातम्या आणखी आहेत...