आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्बंध:नगर अर्बन बँकेच्या निर्बंधात तीन महिन्यांची मुदतवाढ

नगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) ६ डिसेंबर २०२२ पासून निर्बंध लादण्यात आले. मंगळवारी आरबीआयकडून परिपत्रक जारी पुढील तीन महिने ६ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती बँकेच्या प्रभारी चेरमन दीप्ती सुवेंद्र गांधी व मुख्य कार्यकारी अधिकारी एम. पी. साळवे यांनी दिली.

बँकेवर निर्बंध लादल्याच्या घटनेला जूनमध्ये सहा महिने पूर्ण झाली. सुरुवातीला ६ महिन्यांसाठी घातलेले निर्बंध यापूर्वीच तीन महिन्यांच्या कालावधीत वाढवण्यात आले होते. निर्बंध वाढवण्याची ही दुसरी वेळ असून याआधी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली होती. बँकेने निर्बंध लागल्यापासून वसुलीवर भर देत १८७ कोटी रुपयांची वसुली केली असल्याने तसेच अनेक कर्ज खातेदारांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा अवलंब केल्याने व अनुषंगाने बँकेच्या संचालक मंडळाने योग्य पद्धतीने भारतीय रिझर्व्ह बँकेस सर्व समर्पक उत्तर दिल्यानेच बँकेस ७ जुलै २०२२ रोजी प्राप्त नोटीसेप्रमाणे अवसायनात न काढता, बँकेच्या निर्बंधात वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती बँकेच्या प्रभारी चेरमन दीप्ती सुवेंद्र गांधी व मुख्य कार्यकारी अधिकारी एम. पी. साळवे यांनी दिली.

बँकेस आरबीआय नव्याने एक रकमी कर्ज परत फेड योजनेस परवानगी मिळाली असल्याने सर्व थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त होण्याचे आवाहन संचालक मंडळाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...