आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हद्दपार:तिघे जण एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार

संगमनेर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर तालुक्यातील तिघांना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या तिघांवरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल अाहेत. अरबाज करीम शेख (जोवेॅ रोड, संगमनेर), सागर उर्फ शक्तिमान तुकाराम कोकणे (धांदरफळ खुर्द) आणि मंगेश सुरेश घुले (शितला माता मंदिराजवळ संगमनेर) या तिघांवर संगमनेर शहर पोलिस ठाणे आणि संगमनेर तालुका पोलिस ठाणे येथे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे संगमनेर शहर व तालुका पोलिसांनी वरील तिघांना अहमदनगर, नाशिक व पुणे या तीन जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव संगमनेरचे प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे यांच्याकडे सादर केला होता. पोलिसांनी पाठवलेले हे प्रस्ताव वस्तुनिष्ठ असल्याने तिघांना नगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

बातम्या आणखी आहेत...