आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • Three storey Flyover From Aurangabad To Waluj; Travel To Pune Will Be Convenient, Union Minister Nitin Gadkari Announced In The Presence Of Sharad Pawar

घोषणा:औरंगाबाद ते वाळूजपर्यंत तीन मजली उड्डाणपूल; पुणे प्रवास सोयीचा होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शरद पवारांच्या उपस्थितीत घोषणा

नगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद शहर ते वाळूजपर्यंत तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे बोलताना केली. नगर येथील सोनेवाडीत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, रस्ते वाहतूक मंत्रालय व महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संयुक्त विद्यमाने यातील २५ महामार्गांचा लोकार्पण सोहळा गडकरी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, देशाचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी पाणी, वीज, वाहतूक व संपर्क या चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. देशात उद्योग आणायचे असतील तर उद्योग सुरू होण्याच्या अगोदर उद्योजक विचार करतात की या चार गोष्टी आहेत का नाहीत. या चार गोष्टी असल्या तरच उद्योग येतात. त्यामुळे भांडवली गुंतवणूक येते. रोजगार उपलब्ध होतो. औरंगाबाद-वाळूज अंतरात उड्डाणपूल उभारल्याने औरंगाबाद-पुणे प्रवास आणखी सोपा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शरद पवारांची उपस्थिती : या महामार्गांच्या लोकार्पण सोहळ्यास व्यासपीठावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही उपस्थिती होती. याशिवाय पालकमंत्री हसन मुश्रीफ, प्राजक्त तनपुरे, खा. सदाशिव लोखंडे, खा. डॉ. सुजय विखे, आ. बबनराव पाचपुते, आ. रोहित पवार, नीलेश लंके, संग्राम जगताप आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...