आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:नेवासा फाटा येथे तीन वाहनांचा अपघात

नेवासे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात बस, कार आणि ट्रकचा अपघात झाला. ही घटना गुरूवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. तिन्ही वाहनांचे नुकसान झाले असून यात कोणालाही इजा झालेली नाही. पुणे - एरंडोल बस पुण्याहून औरंगाबाकडे जात होती. ती नेवासा फाट्यावर रस्त्याच्या कडेला थांबलेली असताना प्रवासी चढत होते. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती.

याच वेळी समोरून येणारी ट्रक बस निघेपर्यंत जागेवर उभी होती. एका कार चालकाने एसटी आणि ट्रकच्या मधून कार काढण्याचा प्रयत्न केला असता तिन्ही वाहनांचे नुकसान झाले. नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतुक पोलिस सकाळी हजेरी लावून जातात. दिवसातून अनेकदा वाहतूक विस्कळीत होत असते. राजमुद्रा चौकामध्ये रिक्षा आणि वाहने रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्या लावतात. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...