आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआनंददायी शिक्षण देण्यात जिल्हा परिषदेच्या शाळा यशस्वी ठरल्या असल्या, तरी हा संदेश अद्यापही समाजापर्यंत पोहचला नाही. विद्यार्थ्यांना कौशल्ये निर्माण करणारे शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांना भौतिक सुविधा निर्माण कराव्या लागतील. प्रशासन, शिक्षक यांचा समन्वय व लोकसहभागातून हे कार्य शक्य आहे, असे प्रतिपादन गटविकास अधिकारी अनिल नागने यांनी व्यक्त केले. संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी म्हणून सुवर्णा फटांगरे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर महिला शिक्षिकांनी त्यांच्या सत्काराचे आयोजन केले होते, या प्रसंगी नागणे बोलत होते. अरुण जोर्वेकर, शिवनाथ पारधी, अशोक गोसावी, दशरथ धादवड, प्रभाकर रोकडे, वृषाली कडलग, अंजली मुळे, विद्या भागवत, अलका साखरे, मुक्ता शिंदे, संगिता कडुस्कर, प्रतिभा नागरे यावेळी उपस्थित होते.
नागणे म्हणाले, विद्यार्थ्यांचे जीवन कौशल्ये विकसित करणारे शिक्षण देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले पाहिजे. केवळ विद्यार्थी नव्हे तर समाजाने जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेण्याचा आग्रह धरला पाहिजे. या मार्गावर आपण मार्गक्रमण करत आहोत. त्यासाठी शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. डिजिटल व गूगल क्लासरूम सारख्या सुविधा सामाजिक संस्था व लोकसहभागातून मिळवाव्या लागतील. यासाठी नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे शिक्षकांकडून कौशल्याने कामे करून घेतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. फटांगरे म्हणाल्या, सप्तरंगी परिपथातून मुलांमध्ये संस्कारक्षम जीवन कौशल्ये रुजविली जातात. गुणवत्ता पुर्ण शिक्षण प्रणालीचा वापर करून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा राज्यात प्रभावी ठरतील, असे अभियान राबवण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वृषाली कडलग, अंजली मुळे, मुक्ता शिंदे, संगिता कडुस्कर, प्रतिभा नागरे यांनी मनोगत व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.