आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या मुख्य कार्यालयात असलेल्या प्रकल्प विभागासमोरील फरशा सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक उखडल्या. शहर अभियंता सुरेश इथापे यांनी पाहणी केल्यानंतर वाढलेल्या तापमानामुळे या फरशा उखडल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, ही इमारत जुनी असल्याने व फरशा उखडल्याने या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची गरज आहे.
इमारतीत तळमजल्यावर नगर रचना विभाग आहे. पहिल्या मजल्यावर उजव्या बाजूला लेखा विभाग व डाव्या बाजूला अतिक्रमण निर्मूलन विभाग, प्रकल्प विभाग व प्रसिद्धी विभाग आहे. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास अचानक प्रकल्प विभागासमोरून प्रसिद्धी विभागाकडे जाणार्या छोटेखानी बोळीतील फरशा उचकटल्या गेल्या. त्यावरून जा-ये करणारांना फरशीखालील पोकळीमुळे चालताना थरथर जाणवू लागली. एका सरळ रेषेत तीन-चार फरशा उखडल्या गेल्याने नेमके काय झाले, हे पाहण्यास कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. त्यानंतर काहींनी खाली जाऊन नगररचना विभागाचा स्लॅब पाहिला. तो चांगल्या स्थितीत दिसल्याने अचानक फरशा उखडण्याचे गूढ वाढले. त्यामुळे शहर अभियंता इथापे यांना कळवले गेेले. त्यांनीही तातडीने येऊन पाहणी केली.
येथे बसवलेल्या फरशा फेस टू फेस एकमेकांना चिकटून बसवल्या गेल्या आहेत. त्यांच्यात काहीच अंतर ठेवलेले नाही. या फरशा व खालचा स्लॅब यांच्यादरम्यान असलेल्या पोकळीतील हवा गरम झाल्याने त्या दाबाने या फरशा वर उचलल्या गेल्या आहेत. एक-दोन फरशा काढून आतील पोकळी व खालील स्लॅब तपासला असून, तो व्यवस्थित आहे. त्यामुळे येथील फरशा काढल्या असून, तेथे नव्या फरशा बसवल्या जाणार आहेत, असे शहर अभियंता इथापे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.