आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारभार चव्हाट्यावर:भागिरथीबाई तनपुरे कन्या शाळेच्या विद्यार्थिंनींवर पैसे देऊन पाणी घेण्याची वेळ ; कारभार चव्हाट्यावर

राहुरी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरीच्या भागिरथीबाई तनपुरे कन्या शाळेच्या विद्यार्थिंनींवर पैसे देऊन पाणी घेण्याची वेळ आली आहे. यानिमित्त शाळा प्रशासन तसेच शिक्षणाधिकारी यांचा दुर्लक्षीत कारभार चव्हाट्यावर आला आहे.

तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राहुरी शहरातील भागिरथीबाई तनपुरे कन्या शाळेची ही दुरवस्था झाली आहे. शहरातील नूतन मराठी शाळेच्या जागेत गेली अनेक वर्षापासून भागिरथीबाई तनपुरे कन्या शाळा व महाविद्यालय सुरू आहे. शाळेतील विद्यार्थिंनीना पाण्याची सोय उपलब्ध करून देणे ही जबाबदारी असताना मात्र शाळा प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे.

शुक्रवारी दुपारच्या सुट्टीत शाळेच्या प्रांगणात पाणी भरून आलेले वाहन पाहताच विद्यार्थिनींनी या वाहनाजवळ मोठी गर्दी केली. एक रुपयात एक लिटर पाणी मिळत असल्याने शाळेतील विद्यार्थिंनीना सुट्टे पैसे करण्यासाठी शाळेच्या प्रवेशद्वारा बाहेर भटकंती करावी लागली. कन्या शाळेत विद्यार्थिनींची संख्या मोठी असताना पिण्याच्या पाण्याची गैरसोय हा सवाल वादाचा ठरला आहे. राहुरी नगर परिषदेच्या वतीने शहरात गेल्या दोन महिन्यापासुन जलतुप्ती या नावाखाली पैसे टाका व पाणी मिळवा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.या उपक्रमातुन शहरात पाण्याची विक्री सुरू आहे.पाण्याची सोय उपलब्ध नसल्याने शाळा महाविद्यालयात देखील पाणी विक्री केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...