आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धास्ती:झेडपी कर्मचाऱ्यांवरच रांगा लावण्याची वेळ

नगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद मुख्यालयात कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बसवण्यात आलेल्या तीन बायोमेट्रिक यंत्रापैकी दोन यंत्र अचानक बंद पडल्याने एकाच यंत्रणेवर हजेरी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये लेट मार्क पडण्याचीही धास्ती आहे. सर्व यंत्र सुरू होईपर्यंत लेट मार्क सह हजेरी बाबत इतर तांत्रिक बाबी दुर्लक्षित कराव्यात असा सूर कर्मचाऱ्यांमध्ये आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माळीवाडा भागातील मुख्यालयात सुमारे ४५० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी सव्वासहा वाजेपर्यंत आहे. त्यानुसार कर्मचारी कार्यालयात येताना व जाताना या मशीनवर बायोमेट्रिक प्रणालीने उपस्थिती नोंदवतात. यासाठी कार्यालयात बसवण्यात आलेल्या तीन यंत्रांपैकी दोन यंत्र अचानक बंद पडल्याने हजेरी लावणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. एकाच मशीनवर सुमारे चारशे कर्मचाऱ्यांचा भार पडत असल्याने कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

त्यामुळे तातडीने दोन्ही यंत्र दुरुस्त करावेत तोपर्यंत लेट मार्कसह तांत्रिक बाबीत कर्मचाऱ्यांना अडकवू नये अशी मागणी होत आहे. दरम्यान जिल्हा परिषद स्तरावर बायोमेट्रिक हजेरी प्रणाली ठेवायची की फेस रीडिंग ची यंत्रणा सुरू करायची याबाबत विचार सुरू आहे. फेस रीडिंग यंत्रणा उपलब्ध झाल्यास ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उपस्थिती नोंदवता येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...