आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीचा छापा:टायटन बनावट माल नगर बाजारपेठेत; कंपनीचा छापा

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टायटन कंपनीचे बनावट पाकीट व गॉगल विक्री करणार्‍या दुकानावर कारवाई करण्यात आली आहे. रविवारी दुपारी कोतवाली पोलिसांच्या मदतीने एस.एन.जी.सोलीसिटर कंपनीकडून नवीपेठेतील नेताजी सुभाष चौकातील शिवकृपा बेल्ट हाऊस या दुकानात कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान ३१३ पाकीटे, २० गॉगल असा १८ हजार १५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी गौरव श्याम नारायण तिवारी (वय ३६ रा. न्यु दिल्ली) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिवकृपा बेल्ट हाऊसचे संजय धनुमल तनवाणी (वय ५० रा. तारकपूर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तिवारी यांची एस.एन.जी.सोलीसिटर एल.एल.पी.नावाची कंपनी आहे. टायटन कंपनी लि. (बेंगलोर) या कंपनीच्या कोणत्याही मालाची नक्कल करून त्या वस्तू विक्री करीत असेल, तर त्यांच्याविरूध्द कार्यवाही करण्याचे अधिकार टायटन कंपनीकडून फिर्यादी तिवारी यांच्या एस.एन.जी.सोलीसिटर कंपनीला अधिकार पत्राद्वारे देण्यात आले आहे. नवीपेठेत शिवकृपा बेल्ट हाऊस दुकानात टायटन कंपनीचा बनावट मालविक्री होत असल्याची माहिती तिवारी यांच्याकडे प्राप्त झाली होती.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक संपत शिंदे यांना पत्र दिले होते. यांनी उपनिरीक्षक सुखदेव दुर्गे, पोलिस अंमलदार वाघ, इनामदार, अमोल गाढे, सोमनाथ राऊत यांचे पथक तिवारी यांच्या मदतीसाठी दिले. तिवारी यांनी पथकाच्या मदतीने रविवारी दुपारी शिवकृपा बेल्ट हाऊस दुकानात जाऊन पंचासमक्ष तपासणी केली असता टायटन कंपनीचा बनावट माल मिळून आला.

बातम्या आणखी आहेत...