आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाचे शोषण थांबवून पर्यावरण समृद्ध करण्यासाठी:सामाजिक कार्यंकर्त्यांची भूमिका महत्त्वाची; जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांचे मत

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकासासाठी निसर्ग शोषण शिकविणाऱ्या शिक्षण प्रणालीऐवजी निसर्ग संवर्धनावर भर देणारी शिक्षणप्रणाली आणली पाहिजे, निसर्ग संवर्धनात प्रशिक्षित सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका महत्वपूर्ण असून समाजकार्य शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण समृद्ध करण्यासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असे मत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

अहमदनगर येथील सीएसआरडीमध्ये आयोजित 10 व्या भारतीय समाजकार्य कॉंग्रेसच्या फिलिप बार्नबस स्मृती सत्रामध्ये डॉ. सिंह यांनी देशभरातून आलेल्या प्रतिनिधींनीशी संवाद साधला.

अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.जे बार्नबस, सीएसआरडी संस्थेचे संचालक डॉ.सुरेश पठारे, मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे अधिष्ठाता प्रा. पी.के. शहाजन, दिल्ली विद्यापीठाच्या समाजकार्य विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ.संजय भट्ट आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. राजेंद्र सिंह म्हणाले, पाण्याची टंचाई आणि पाण्याचा अतिरेक हे दोन्ही संकटे आहेत. पाणी हे जीवन, उपजीविका आणि प्रतिष्ठा आहे. सामाजिक कार्य हे मदत आणि सेवेकडून पर्यावरणीय न्यायाकडे गेले आहे. नैसर्गिक संसाधने व्यावसायिक वापरासाठी नसून वापरासाठी आहेत. कमाईसाठी शिकणे धोकादायक आहे.

सामाजिक अभिसरण, लोकांचे निर्णय नद्या पुनरुज्जीवित करू शकतात. एकविसावे शतक हे मानवजातीसाठी आव्हानात्मक आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपाने पृथ्वीचे तापमान सातत्याने वाढत आहे. ज्ञानासह विज्ञान, विवेक आणि काळजी असलेले तंत्रज्ञान आपल्याला संकटांपासून वाचवू शकते.असे ते म्हणाले.

डॉ. राजेंद्र सिंह पुढे म्हणाले,निसर्गाची साधनसंपत्ती वापरण्याचे शिक्षण दिले जाते. मात्र, निसर्ग संवर्धनाबद्दल शिकवले जात नाही. त्यामुळे समाजकार्यकर्त्यांनी निसर्ग संवर्धनालाच प्राधान्य देणारी शिक्षणप्रणाली देण्यावर भर दिला पाहजे असे मत व्यक्त केले.

शाश्वत पाणीसाठा धरतीच्या उदरात चिरकाळ टिकावा, आपणच आपल्याला पुरेशा जलसाठ्याची तरतूद केली पाहिजे अथवा येणाऱ्या दहा वर्षात शून्य जलसाठा होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे.त्यामुळे पायावार्रण साक्षर समाज निर्माण करण्याच्या वसा समाजकार्यकर्त्यानी निरंतर सुरु ठेवला पाहिजे असे त्यांनी जाणीवपूर्वक सांगितले.

बातम्या आणखी आहेत...