आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अण्णा हजारेंचा शिवसेनेला इशारा:सेनेच्या मंत्र्यांची भ्रष्टाचारप्रकरणे बाहेर काढणार; शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका होताच अण्णांचा इशारा

पारनेर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांविरोधात माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत : अण्णा हजारे

शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांविरोधात माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत. ते बाहेर काढावे लागतील, असा सज्जड इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला.

उपोषण स्थगित करण्याच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली असून अण्णा केवळ काँग्रेसच्या राजवटीत आंदोलने करतात. तसेच हजारे यांच्या भूमिकेविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे संतापलेल्या अण्णांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचे ‘डिटेल्स’ आपल्याकडे आहेत, ते जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. हजारे यांनी १९९७ मध्ये आळंदीत झालेल्या आंदोलनाची आठवण करून दिली. या आंदोलनामुळे शिवसेनेच्या बबनराव घोलप, शशिकांत सुतार या भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले. आपल्या मागणीनुसार स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती सावंत आयोगाच्या चौकशीत तत्कालीन मंत्री घोलप आणि सुतार गैरव्यवहार प्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. या गोष्टी तुम्ही विसरला काय, असा सवाल हजारे यांनी शिवसेनेला केला.

विश्वासार्हता कमी झालेली नाही :

हजारे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर विश्वासार्हतेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी अस्वस्थ झालेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तरांची गरज नसल्याचे सांगत पत्रकार परिषद गुंडाळण्याचा प्रयत्न केला. शनिवारी पुन्हा त्याबाबत हजारे यांना छेडले असता ज्यांनी ज्या रंगाचा चष्मा घातला आहे, त्यांना त्याच रंगाचे दिसणार, असे ते म्हणाले.

राज्यमंत्री बच्चू कडू राळेगणसिद्धीत

जलसंपदा व शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी राळेगणसिद्धीत हजारे यांची भेट घेतली. राज्याच्या विविध विभागातील भौगोलिक, नैसर्गिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे शेतीमालाला विभागनिहाय हमीभाव मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री कडू यांनी व्यक्त केली.