आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीच्या आखाड्यात दिग्गज नेत्यांनी घराणेशाहीचा राजकीय वारसा कायम ठेवण्यासाठी घरातूनच उमेदवाऱ्या देत प्रतिष्ठा पणाला लावली आहे. जिल्ह्यातील लक्षवेधी लढत, श्रीगोंदे तालुक्यातील काष्टीत होणार आहे. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र प्रतापसिंह पाचपुते यांच्या विरोधात घरातूनच त्यांचे बंधू स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांचे पुत्र साजन पाचपुते रिंगणात उतरले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी आटोपताच जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूकींचा बिगुल वाजणार आहे. या निवडणुकीसाठी आजी-माजी सदस्यांसह नव्या इच्छुकांनी वर्षभरापासूनच तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठीची पहिली तयारी म्हणून जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी सरपंच व सदस्य पदासाठी घरातूनच उमेदवार दिले आहेत. राजकीय वारसा कायम राहावा या हेतूने ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुढची रणनीती आखली आहे.
या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २०३ ग्रामपंचायतच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, त्यातील ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने १९५ गावांमध्ये रविवारी मतदान होणार आहे. या मतदानासाठी शनिवारी (१७ डिसेंबर) कर्मचारी व अधिकारी मतदान यंत्र घेऊन मतदान केंद्रांकडे रवाना झाले. नगरच्या तहसील कार्यालयाच्या आवारात नियुक्त कर्मचाऱ्यांनी गर्दी होती. खाजगी वाहनांच्या रांगा तहसील कार्यालयाच्या बाहेर लागलेल्या होत्या. त्याचबरोबर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
काष्टीत आ. पाचपुते यांची प्रतिष्ठा पणाला
काष्टीत प्रताप सिंह पाचपुते व साजन पाचपुते रिंगणात आहे. बेलवंडीत जि.प.चे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांचे पुत्र ऋषिकेश शेलार सरपंच पदासाठी रिंगणात आहेत. घोगरगावाते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या पॅनलविरोधात कुकडी कारखान्याचे संचालक बाळासाहेब उगले यांनी पॅनल उभा केला.
शिंदे, पवार यांच्या कार्यकर्त्यांत चढाओढ
अकोले तालुक्यातील सोनलवाडी, श्रीवंडी, लोहगाव (राहता), खुपटी (नेवासे), कमालपूर, वांगे खुर्द (श्रीरामपूर), पिंपळगाव लांडगा (नगर), बनपिंपरी (श्रीगोंद) या आठ ग्रामपंचायतीचा समावेश आहे. कर्जत -जामखेड मतदारसंघात आमदार राम शिंदे, आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांत चढाओढ आहे.
जोर्वेत विखे विरुद्ध थोरात गटात सामना
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर ३७ पैकी एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नाही. थोरात यांचे जोर्वे, तर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना १२ पैकी लोहगाव ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश आले. जोर्वेत १३ जागांसाठी विखे यांचे जनसेवा मंडळ तर थोरातांचा शेतकरी विकास मंडळ रिंगणात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.