आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षता:अपघातग्रस्तांचे जीवनदूत म्हणून कर्तव्य बजवावे; वाहतूक नियमांबाबत जनजागृती रॅली

नगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्यावतीने रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत शहरातून जनजागृती रॅली काढण्यात आली. अपघातग्रस्तांचे जीवनदूत म्हणून कर्तव्य बजावण्याचे आवाहन नागरिकांना माहिती पत्रकांद्वारे करण्यात आले.

तारकपूर बस स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमास सहाय्यक परिवहन अधिकारी संदीप खडसे, मोटार वाहन निरीक्षक आयशा हुसेन, तारकपूर आगार व्यवस्थापक मनीषा देवरे, कार्यशाळा अधीक्षक अभिजीत आघाव, मंगेश बर्डे आदींसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक व प्रवासी नागरिक उपस्थित होते.

संदीप खडसे म्हणाले, स्वत:च्या सुरक्षिततेसह इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. अपघातात एखादा कर्ता पुरुष दगावल्यास तो संसार उघड्यावर येतो. कुटुंबीयांच्या जबाबदारीचे भान ठेवून प्रत्येकाने अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळावे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी जीवनदूतची भूमिका पार पाडताना, जखमींचा जीव वाचविण्यासाठी त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात अपघातग्रस्त व्यक्तीस मदत करण्याच्या उद्देशाने जीवनदूतची कर्तव्य व महत्त्व सांगणाऱ्या माहिती पत्रकाचे अनावरण करुन त्याचे वाटप करण्यात आले. सुकन्या क्षेत्रे यांनी उपस्थितांना वाहतुकीचे नियम पाळणे व अपघातग्रस्तांना मदत करण्याची शपथ दिली. गोरक्ष कोरडे यांनी जीवनदूतची माहिती दिली. जनजागृती रॅलीही काढण्यात आली. सूत्रसंचालन राहुल सरोदे, सूरज उबाळे यांनी केले. आयशा हुसेन यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...