आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:दिशाहीन परिस्थितीला थोपवण्यासाठी गुणवंतांना खतपाणी घालावे लागेल; अंनिसचे कार्यवाह बाबा आरगडे यांचे प्रतिपादन

कुकाणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गावे व माणसांची जडणघडण कशी असावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता लिहिली एकमेकांच्या सहकार्याशिवाय माणसांना जगता येणार नाही व गावेही सुधारणार नाही, असा संदेश ग्रामगीतेने दिला. आजच्या दिशाहीन परिस्थितीला थोपवायचे असेल तर गुणवंतांना खतपाणी घालावे लागेल, असे प्रतिपादन अंनिसचे कार्यवाह बाबा आरगडे यांनी केले.

नेवासे तालुक्यातील गोंडेगाव येथे जनकल्याण फाऊंडेशनच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जयंतीदिनी संत तुकडोजी महाराज पुरस्कारांचे वितरण अंनिसचे डॉ मनिष लढ्ढा, बाबा आरगडे व सभापती रावसाहेब कांगुणे यांच्या हस्ते उद्योजक बजरंग पुरी, साहित्यिक शर्मिला गोसावी, आरोग्य सेविका अल्का सातपुते, पत्रकार अनिल गर्जे, कृषीभूषण नामदेव चेडे व कलावंत शाहीर भोर गाडेकर, अंनिसचे डॉ लढ्ढा, ग्रंथपाल पोपट उगले व संजय वाघमारे यांना सन्मानित करण्यात आले.

गिता मुळे, जयश्री लोंढे, प्रकाश बोर्डे यांची पोलिस उपनिरीक्षक पदी तर विजय मते यांची कृषी अधिकारीपदी नियुक्ती झाल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला. आरगडे यांनी शासनाला धाक वाटावा असे काम करण्याचा सल्ला देत कोणताही पत्रव्यवहार न करता समाजातील गुणवंतांना प्रेरणा मिळावी व भावी कार्य उज्ज्वल करण्यासाठी हे पुरस्कार दिल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...