आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई हाेण्यासाठी आज ढाेल बजाव आंदाेलन

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारतरत्न अटलबिहारीजी वाजपेयी आयलॅंड विकसित करण्याच्या निविदा कामासंदर्भात श्रीरामपूर नगरपालिकेच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून माजी उपनगराध्यक्ष तथा काॅंग्रेसचे शहराध्यक्ष संजय छल्लारे हे सोमवारी (७ नाेव्हेंबर) नगरपालिकेसमोर ढोल बजाव आंदोलन करणार आहेत. छल्लारे यांनी यापूर्वी घेराव,उपोषण,,बैठा सत्याग्रह, आदी आंदोलने केली.

त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून चौकशी केली होती. मात्र चार महिने झाले, चौकशी होऊनही दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही. या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आयलॅंड प्रकल्प विकसित करावा, या मागणीसाठी सोमवारी सकाळी १० वा पालिकेसमोर आंदोलन करण्यात येणार, असे छल्लारे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...