आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूर्व परीक्षा:50 उपकेंद्रांवर आजमहाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा

श्रीरामपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा शनिवार, ८ ऑक्टोबर २०२२ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील ५० उपकेंद्रावर होणार आहे. या परिक्षेसाठी अहमदनगर शहरातील ५० उपकेंद्रावर एकूण १६०८१ उमेदवार परिक्षेस बसलेले आहेत.

या उपकेंद्रावर (शाळा/महाविद्यालय) उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. केंद्रप्रमुख म्हणून प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ जबाबदारी पार पाडणार आहेत. परीक्षेसाठी १३ उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी,२ भरारी पथक प्रमुख,५० वर्ग १ संवर्गातील उपकेंद्र प्रमुख अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग ३ संवर्गातील असे एकूण १४२५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ९.३० वाजता प्रवेश देण्यात येणार आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवणेकामी परिक्षेच्या दिवशी परिक्षाक्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम १९७३ चे कलम १४४ (३) लागू करण्यात आलेले आहे. परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्वतः आयोगाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावयाची आहेत.

बातम्या आणखी आहेत...