आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:उड्डाणपूल व बायपासवर पथकर वसूल करावा

नगर6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन झालेला शहरातील उड्डाणपूल व कल्याण रोडवरील बायपास येथे पथकर लावावा. त्यातून जमा झालेला महसूल शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी वापरून शहर खड्डेमुक्त करावे. शुक्रवारी होणाऱ्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत हा विषय अजेंड्यावर घेऊन नगरसेवकांनी जनतेच्या हितासाठी याला मंजूरी द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक दीप चव्हाण यांनी केली आहे.

शहरात सक्कर चौक ते अशोका हॉटेल पर्यंत नवीन उड्डाणपूल झाला आहे. त्याचे उद्घाटनही झाले. वाहतुकीसाठी तो खुला करण्यात आला. या पुलावरुन व शहरालगत असलेल्या रस्त्याचा वापर करुन चारचाकी वाहने जात आहेत.

सध्या मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. या खड्डेमय रस्त्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. मनपाचे उत्पन्न वाढून तो शहरातील रस्त्यांची कामे होण्यासाठी नवीन उड्डाणपूल व कल्याण रोडवरील बायपास येथे येणाऱ्या चारचाकी वाहनांकडून पथकर वसूल केल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...