आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधारे भरली तुडुंब:जेऊर परिसरामध्ये मुसळधार पाऊस; चार तास वाहतूक ठप्प

नगर तालुका18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर तालुक्यातील जेऊर परिसरात पावसाने जोरदार सलामी दिली असून पहिल्याच पावसात सीना व खारोळी नदीला पूर आला होता. सीना नदीच्या महापुराचे पाणी दुकानांनी गेल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाने मागील वर्षी झालेल्या ढगफुटीच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.

जेऊर ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब भरून सीना व खारोळी नदीला महापूर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. सुमारे दीड तास सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. शेतकऱ्यांचे बांध मोठ्या प्रमाणात फुटले असून सीना नदीच्या महापुराने बाजारपेठेतील दुकानांनी पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. जेऊर परिसरातील सर्व ओढे, नाले, बंधारे तुडुंब भरून वाहत होते.

अनेक मोठमोठाले वृक्ष, विद्युत लाईनचे पोल, महामार्गालगतचे फ्लेक्स बोर्ड पडल्याने तसेच सिना नदिच्या पुराचे पाणी महामार्गावरील पुलावरुन गेल्याने नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा सुमारे आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. महामार्गालगत असणाऱ्या दुकानांनी पाणी शिरल्याने त्या व्यावसायिकांचे देखील नुकसान झाले. ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक रस्ते, पूल, शेतकऱ्यांचे बांध वाहून गेले आहेत. सीना नदीच्या महापुराचे पाणी संपूर्ण बाजारपेठेत घुसले होते.

बातम्या आणखी आहेत...